DISTRICT SETU COMMITTEE, NANDED

COLLECTOR OFFICE NANDED

अर्ज तपासणीचे विविध टप्पे


  1. सर्व प्रथम अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या आधारे प्राथमिक पात्र/अपात्र ची यादी दिनांक 20/03/2026 रोजी सायंकाळी 5.00 वा. नांदेड जिल्हयाच्या संकेतस्थळावर https://nanded.gov.inhttps://setusamitinanded.in/ प्रसिद्ध करण्यात येईल.
  2. पात्र/अपात्र यादीवरील अक्षेप दिनांक 21/03/2026 ते 22/03/2026 रोजी सायंकाळी 05.00 वा. पर्यंत ऑनलाईन सादर करावीत. सदरची सुविधा ऑनलाईन अर्ज केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आपण युजर आयडी वापर करून अक्षेप दाखल करू शकता. त्यामुळे अन्य मार्गाने अक्षेप सादर करू नयेत. अन्य मार्गाने प्राप्त अक्षेपांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  3. पात्र/अपात्र यादीवरील अक्षेपावर दिनांक .24/03/2026 रोजी दुपारी 12.00 वा. सुनावणी घेण्यात येईल.
  4. सुनावणीनंतर दिनांक 25/03/2026 रोजी सायंकाळी 05.00 वा. अंतिम पात्र/अपात्र यादी नांदेड जिल्हयाच्या संकेतस्थळावर https://nanded.gov.inhttps://setusamitinanded.in/ प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यासाठी जिल्हा सेतू समितीच्या बैठकीमध्ये पात्र अर्जांची निकषानुसार निवड करून अंतिम मान्यता प्रदान करण्यात येईल.
  5. अंतिमतः मंजूर करण्यात आलेल्या आपले सरकार सेवा केंद्र चालकांना अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रतीसह तपासणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे बोलविण्यात येईल. मूळ कागदपत्रांच्या तपासणीसाठीचा दिनांक व वेळ नांदेड जिल्हयाच्या संकेतस्थळावर https://nanded.gov.in वेगळयाने प्रसिद्ध करण्यात येईल. याकामी अर्जदारांनी या कार्यालयास भेट देऊ नये.
  6. कागदपत्र तपासणी पूर्ण झाल्यानंतर मंजूर केंद्र चालकांनी राष्ट्रीयकृत बँकेचा रक्कम रु. 20,000/- चा धनाकर्ष "E-SUVIDHA COLLECTORATS NANDED" या नावाने अनामत (Deposit) म्हणून या कार्यालयास जमा करावा लागेल, अन्यथा आपणास मंजूर करण्यात आलेले केंद्र रद्द करण्यात येईल.
  7. त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्राचा आयडी उपलब्ध होण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात येईल. वरिष्ठ कार्यालयाकडून केंद्रचालकास अर्जात नमूद केलेल्या ई-मेल आयडीवर युजर आयडी व पासवर्ड प्राप्त होतील. त्यामुळे अर्जदारांनी आपला मेल आयडी व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करावा. चुकीचा मेल आयडी नमूद केल्यास सर्वस्वी जबाबदारी अर्जदाराची असेल.
  8. आपले सरकार सेवा केंद्र मंजूर झालेल्या केंद्र चालकांनी 01 महिन्यात संबंधित पोलीस स्टेशनचे चारीत्र्य प्रमाणपत्र या कार्यालयास सादर करणे बंधनकारक असेल. संबंधित पोलीस स्टेशनचे चारीत्र्य प्रमाणपत्र प्रत 01 महिन्याच्या आत या कार्यालयास सादर न केल्यास अर्जदारास मंजूर करण्यात आलेले आपले सरकार केंद्र रद्द करण्यात येईल. (अर्जदाराच्या चारित्र्य प्रमाणपत्रावर गुन्हा असल्याचे आढळून आल्यास त्यांना मंजूर करण्यात आलेले केंद्र रद्द करण्यात येईल.)
  9. उपरोक्त सर्व प्रक्रियेसाठी आपण वेळोवेळी https://nanded.gov.inhttps://setusamitinanded.in/ या संकेतस्थळावर भेट द्यावी.

Login

Registration period has ended
(Closed on 28 February 2026 at midnight)

Important

जाहिरात

अनिवार्य कागदपत्र

निकष

अटी व शर्ती

अर्ज तपासणीचे विविध टप्पे

अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे


Registration Starts: 14/02/2026

Previous Registration Ends: 23/02/2026 (12:00 Midnight)

Registration Extended: 28/02/2026 (12:00 Midnight)

First List: 20/03/2026 5.00 PM

First Objection: 21/03/2026 to 22/03/2026 5.00 PM

Hearing: 24/03/2026 12.00

Final List 25/03/2026 5.00 PM