DISTRICT SETU COMMITTEE, NANDED

COLLECTOR OFFICE NANDED

“आपले सरकार सेवा केंद्र” मंजूर करण्यासाठीचे निकष


जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत सेतू प्रभारी अधिकारी व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक हे संयुक्तरीत्या अर्जाची छाननी पार पाडतील. तसेच दि. २३/०८/२००२ च्या शासन निर्णयान्वये स्थापित केलेल्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा सेतू समिती समोर सदर प्रस्ताव ठेवून आपले सरकार सेवा केंद्र देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.

आपले सरकार सेवा केंद्र प्रदान करण्यासाठी त्या-त्या भौगोलिक क्षेत्रात एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास खालीलप्रमाणे प्रक्रिया राबवून गुणांकन करण्यात येईल.

समितीव्दारे खालीलप्रमाणे गुणांकनाची व मुलाखतीची प्रक्रिया पार पाडण्यात येईल. तसेच सदर समितीचा निर्णय अंतिम असेल.

सदर निवड प्रक्रियेमध्ये एकूण १०० गुण निर्धारीत करण्यात येतील. गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल:

  1. कोणत्याही शाखेचा पदवीधर असल्यास३० गुण
  2. कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असल्यास२५ गुण
  3. सीएससी केंद्र असल्यास२५ गुण
  4. समितीकडील मुलाखतीचे गुण२० गुण

वरील गुणांकनानुसार उच्च गुण मिळवणाऱ्या अर्जदारांना प्राधान्याने आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यात येईल.

Login

Registration period has ended
(Closed on 28 February 2026 at midnight)

Important

जाहिरात

अनिवार्य कागदपत्र

निकष

अटी व शर्ती

अर्ज तपासणीचे विविध टप्पे

अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे


Registration Starts: 14/02/2026

Previous Registration Ends: 23/02/2026 (12:00 Midnight)

Registration Extended: 28/02/2026 (12:00 Midnight)

First List: 20/03/2026 5.00 PM

First Objection: 21/03/2026 to 22/03/2026 5.00 PM

Hearing: 24/03/2026 12.00

Final List 25/03/2026 5.00 PM