DISTRICT SETU COMMITTEE, NANDED

COLLECTOR OFFICE NANDED

नवीन आपले सरकार सेवा केंद्र मिळणेकामी सादर करावयाची आवश्यक कागदपत्र


  1. अर्जदारांनी एका वेळी एकाच केंद्रासाठी अर्ज करावा.
  2. अर्जदार ज्या ग्रामपंचायतीचा रहिवासी आहे त्याच ग्रामपंचायतीसाठी अर्ज करावा. इतर ग्रामपंचायतीसाठी अर्ज केल्यास तो अपात्र समजण्यात येईल.
  3. अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असावे. (कमाल वयोमर्यादा 50 वर्ष)
  4. शैक्षणिक पात्रता: अर्जदार किमान बारावी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बारावी, पदवी, पदव्युत्तर चे गुणपत्रक सोबत जोडावे.
  5. संगणक अर्हता प्रमाणपत्र: MS-CIT किंवा NIELIT संस्थेमार्फत राबविलेला CCC (Course on Computer Concept)
  6. आधार कार्ड
  7. निवडणूक ओळखपत्र (Voter ID)
  8. पॅन कार्ड: अर्जदारांच्या नावाचे पॅनकार्ड जोडावे. आधार कार्ड व पॅनकार्डवर एकच नाव असणे आवश्यक आहे.
  9. जागेच्या मालकी हक्काची कागदपत्रे / पुरावा: (खालील पैकी एक)
    • ग्रामपंचायतीचा नमुना नं. ८
    • घर कर पावती (चालू वर्षाची)
    • रेशन कार्ड
    • स्वतःचे घर नसल्यास घरमालकाचे भाडेपत्र (भाडेपत्रासोबत घरमालकाचे चालू वर्षाची मालमत्ता कर पावती किंवा लाईट बिल जोडावे)
  10. नियोजित जागेचे फोटो: अर्जदारास आपले सरकार सेवा केंद्र चालविण्यासाठी नियोजित जागेचे आतील व बाहेरील फोटो (Notecam Android app द्वारे) अक्षांश व रेखांशासह काढलेले फोटो जोडणे आवश्यक आहे.
  11. बँक पासबुक: बँकेच्या पासबुकची स्वयंसाक्षांकित प्रत
  12. पोलीस चारीत्र्य प्रमाणपत्र: संबंधित पोलीस स्टेशनचे चालू महिन्याचे चारीत्र्य प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे. (चारीत्र्य प्रमाणपत्र नसेल तर प्रमाणपत्र सादर केलेल्याची पोच पावती जोडावी)
  13. रहिवासी दाखला: अर्जदार ज्या ग्रामपंचायत/गावाचा रहिवासी आहे त्या गावातील ग्रामसेवक यांचा रहिवासी दाखला अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे. (सदर जाहिरातीकरिता केवळ ग्रामसेवक यांचाच रहिवासी दाखला ग्राह्य धरला जाईल यांची नोंद घ्यावी.)
  14. अर्ज शुल्क: अर्ज शुल्क रक्कम रु. 500/- “E-SUVIDHA COLLECTORATS NANDED”, Gurudwara Branch Nanded, A/c No. 52073059077, IFSC Code: SBIN0021097 या खात्यात जमा करून जमा केल्याची पावती ऑनलाइन अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.

Login

Registration period has ended
(Closed on 28 February 2026 at midnight)

Important

जाहिरात

अनिवार्य कागदपत्र

निकष

अटी व शर्ती

अर्ज तपासणीचे विविध टप्पे

अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे


Registration Starts: 14/02/2026

Previous Registration Ends: 23/02/2026 (12:00 Midnight)

Registration Extended: 28/02/2026 (12:00 Midnight)

First List: 20/03/2026 5.00 PM

First Objection: 21/03/2026 to 22/03/2026 5.00 PM

Hearing: 24/03/2026 12.00

Final List 25/03/2026 5.00 PM